दहावी परीक्षेत ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
या विद्यालयातील कु.श्रेयस रामदास खरात ८४% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमारी सिद्धी महादेव ठोंबरे ७९.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कु.शिवम हनुमंत थोरात ७२% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना गिरीधर गावडे, शितल फरतडे, पुनम जाधव, माधुरी बनकर, आशा धापटे, चक्रधर जाधव, राजेंद्र भोसले या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले असून विद्यालयात 'लीड'च्या माध्यमातून दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, सचिव सौ.साधनाताई गावडे, संभाजीराव गावडे, प्राचार्य गिरिधर गावडे, उपप्राचार्य शितल फडतरे, ॲडमिनिस्ट्रेटर रमेश सस्ते यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
