फलटण, माळशिरसमधील विद्यार्थ्यांचे मॅथ्स जीनियस ओलंपियाड स्पर्धेत नेत्रदीपक यश
गणितासारख्या अवघड विषयासंबंधी विद्यार्थ्यांच्यामध्ये आवड व गोडी निर्माण व्हावी या हेतूने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित "मॅथ्स जीनियस ओलंपियाड" नावाच्या स्पर्धापरीक्षेत फलटण व माळशिरस तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या स्पर्धापरीक्षेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक इयत्तामधून पाच विजेते विद्यार्थी घोषित करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर, ब्राँझ, कॉपर मेडल व प्रमाणपत्र या स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
गणित विषयाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, गणित विषयाची विद्यार्थ्यांमधून भीती जावी, एक प्रकारचा आनंददायी विषय बनावा यासाठी प्रयत्न केला जात असून बुद्धिमान, बलशाली व सक्षम भारत बनवण्याचा उद्देश या स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे.

अविनाश अनंत कुलकर्णी व सौ.कल्याणी अविनाश कुलकर्णी या दोघा उभयतांनी या परीक्षेचे काम पाहिले असून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेतून संशोधनात्मक प्रयोग उपलब्ध करून देण्याचे काम श्री व सौ.कुलकर्णी सातत्याने करीत आहेत.
या परीक्षेत श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर (फलटण), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (विडणी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (झिरपवाडी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (इरिगेशन बंगला, कोळकी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (राऊतवाडी, विडणी), बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला (नातेपुते), स्वर्गीय शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर (कोळकी) आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
