एसटी व कार अपघात महिलेचा मृत्यू ; तिघे गंभीर जखमी
एकता दर्शन : फलटण-पंढरपूर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आणि वेरना कार यांच्यात समोरासमोरा धडक होवुन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
फलटण-पंढरपूर मार्गावर पिंपरद गावच्या हद्दीत मुंजवडी (ता. फलटण) येथून फलटणकडे जाणारी एसटी बस आणि फलटण येथून सांगोल्याकडे जाणारी वेरना कार यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली. हि घटना दिनांक २५ रोजी सकाळी ७ वाजता घडली. या घटनेत वेरना कारमधील कमल भिमराव येलपले (वय ६७) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, मोहन भिमराव येलपले (वय ३७) स्वयंम सचिन येलपले, वरद मोहन येलपले हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर फलटण येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
सदर अपघाताच्या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करीत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
