जेव्हा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी दाखवतात दोस्तीची मिसाल...
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे एका कार्यक्रमानिमित्त फलटणला आले होते. श्रीकांत देशपांडे यांचं आणि या मातीचं एक वेगळं नातं आहे, कारण फलटण तालुक्याशेजारी असणाऱ्या खटाव तालुक्यातील डिस्कळ हे त्यांचं मूळ गाव असून याच डिस्कळमध्ये त्यांचं पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. त्यामुळे डिस्कळ असेल किंवा फलटण देशपांडे यांचं आणि येथील परिसराचं भावनिक नातं येथील कार्यक्रमाच्यानिमित्तानं पहायला मिळालं. त्याचाच हा एक किस्सा...
श्रीकांत देशपांडे फलटणला आल्यानंतर त्यांचा पहिली ते सातवीपर्यंतचा एक जीवश्य कंठश्य मित्र त्यांना भेटायला आला. अर्थात खटाव तालुक्यातील डिस्कळसारख्या दुष्काळी भागात राहणारा ग्रामीण धाटणीचा एक गृहस्थ मुंबईत मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणजेच राज्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटायला आला. हल्ली तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या किंवा एखाद्या शासकीय कार्यालयात कंत्राटी शिपायाचासुद्धा वेगळाच तोरा आपल्याला पहायला मिळतो. परंतु राज्याच्या निवडणूक निर्णय प्रक्रियेतील वर्तुळात वास्तव्य असणाऱ्या श्रीकांत देशपांडे यांनी डिस्कळवरुन आलेल्या या गृहस्थाची भेट घेण्यात कोणतीही कुचराई केली नाही किंवा संकोच बाळगला नाही. आपण उच्चपदस्थ अधिकारी आहोत याचा कोणताही सो So Called attitude दाखवला नाही.
त्यांनी थेट आपल्या मित्राला जेवायला बोलावले. जिथे राज्यातले सगळे उच्चपदस्थ बसले होते, त्याच पंगतीत या मित्राने देशपांडे यांच्या शेजारी बसून जेवण देखील केले. जेवण करत असताना देशपांडे अभिमानाने सांगत होते, "हा माझा पहिली ते सातवीपर्यंतचा मित्र आहे." यानंतर देशपांडे यांच्यासोबत मुंबईहून आलेले इतर मान्यवर त्या गृहस्थाशी बोलू लागले. त्यातल्या एकाने देशपांडे यांच्या मित्राला सांगितल, "आम्ही कालच पुसेगाववरुन फलटणला डिस्कळमार्गे आलो. "या वाक्यानंतर त्या मित्राने देशपांडे यांना जो लूक दिला तो फक्त एक मित्रच आपल्या जवळच्या मित्राला देऊ शकतो. "डिस्कळमार्गे तुम्ही येऊन गेला पण, मला काहीच कळू दिलं नाही.", असा तो लूक मित्राच्या डोळ्यातूनच विचारत होता. हे पंगतीत बसलेल्या सर्वांनी पारखले आणि दोघांच्या घनिष्ठ मैत्रीची चवीने चर्चा केली....
पंगत उठली आणि श्रीकांत देशपांडे यांच्यासारखा खरा आणि Down to earth मित्र सर्वांनाच मिळो, अशी चर्चा बसलेल्या सर्वांच्यात सुरु झाली. थोडक्यात काय तर "ये दोस्ती हम नहीं छोडेंगे..." या लोकप्रिय गाण्याचा अनुभव उपस्थितांनी अनुभवला.
- चैतन्य दिलीप रुद्रभटे, फलटण.
९१५८६०६०४६
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
