गुणवरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम
एकता दर्शन (गुणवरे ता. फलटण) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमत्त गुणवरे ता. फलटण येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता गुणवरे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. अधिका उत्तमराव गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता ग्रामपंचायत, समता सैनिक दल, पंचशील सामाजिक संस्था, रक्तवीर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. यावेळी सहाय्यक निबंधक इंदापूर जे.पी. गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गावडे, प्रा. रमेश आढाव, पोलीस पाटील अमोल आढाव, पंचशील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिकंदर आढाव, रक्तविर सामाजिक संघटनेचे आशिष काटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रक्तदान शिबीर विकास सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले असून प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांमार्फत प्रोत्साहनपर भेटवस्तू दिली जाणार आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील समाजमंदिरात अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
