ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Tuesday, 19 May 2026

Follow Us:

फलटण येथे रेकॉर्डब्रेक गर्दीत धम्मचक्र प्रवर्तन दिन व भीमगीतांचा कार्यक्रम

Share This Article:
फलटण येथे रेकॉर्डब्रेक गर्दीत धम्मचक्र प्रवर्तन दिन व भीमगीतांचा कार्यक्रम

"तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय..रं" या सुप्रसिद्ध भीमगीताला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे चित्र ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिसून आले.

६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सोनिया चॅरिटेबल ट्रस्टने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले उपरोक्त गीत खरात यांनी मंचावर सादर करताच लहानांपासून वयोवृद्ध पर्यंतच्या प्रेक्षकांनी या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान या गीताचे सादरीकरण करणाऱ्या गायिका कडुबाई खरात, गायक उमेश गवळी, रिल स्टार बुद्धीतेजा बोदडे, शिवानी  कांबळे, कपिल मोरे व अन्य उपस्थित कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

प्रारंभी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्याहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पित करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्यावतीने आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, आणि  सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला

याप्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, राजकारणात सुरवातीपासूनच आपल्याला मंगळवार पेठेतील नागरिकांनी उत्तम सहकार्य केले व यापुढेही करतील अशी अपेक्षा व्यक्त करीत डॉ. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा या दिलेल्या संदेशाचे पालन कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. सामाजिक चळवळींना ज्ञानाचे अधिष्ठान असले पाहिजे यासाठी समाजाने शिक्षणाला प्राधान्य द्यावे. शिक्षणातून पिढी घडत असते. बाबासाहेबांनी हेच आदर्शवत काम समाजासमोर निर्माण केले आहे.

लोकप्रिय आमदार चव्हाण म्हणाले, भगवान गौतम बुद्धांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी बौद्ध समाज हा इतर बहुजन समाजाला बरोबर घेऊन काम करीत आहे, आणि हेच काम लोकशाहीला पूरक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान सामाजिक विषयांवर आधारित असलेली "चांडाळ चौकडीच्या करामती" या वेबसिरीजमधील कलाकारांचा सन्मान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रा. भीमदेव बुरुंगले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, शामराव अहिवळे, प्रा. रमेश आढाव, यशवंत खलाटे, डॉ. सुभाष गायकवाड, ॲड. रोहित अहिवळे, दत्ता अहिवळे, विकास काकडे, विजय येवले, मधुकर काकडे, सचिन मोरे, शक्ती भोसले, विजय भिसे, अनमोल जगताप, सनी काकडे, मंगेश आवळे, महादेव गायकवाड आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक सनी अहिवळे (दादा), त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुपर्णा अहिवळे, हरीश उर्फ आप्पा काकडे, संग्राम अहिवळे, सिद्धार्थ अजित अहिवळे, शिवा अहिवळे, ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. आभार सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. सुपर्णा अहिवळे यांनी मानले. या कार्यक्रमास शहर व तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार रामराजेंनी घेतला भीमगीतांचा आस्वाद : 

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांनी गायलेल्या सुरवातीच्या एक दोन भीमगीतांचा आस्वाद श्रीमंत रामराजे यांनी प्रेक्षकांच्या अग्रभागी बसून घेतला असल्याचे बोलके चित्र यावेळी ठळकपणे दिसत होते. दरम्यान उपस्थित अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळता आला नाही.

Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...

महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....

संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...

दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...