निवडणूक पात्र संस्थांची प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम दि. १० पासून
एकता दर्शन : फलटण तालुक्यातील 'क' आणि 'ड' प्रवर्गातील निवडणूक पात्र संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम दिनांक १० मार्च पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती तालुका सहकारी संस्था निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक अधिकारी सुनील धायगुडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
'क' प्रवर्गातील निवडणूक पात्र सहकारी संस्था खालीलप्रमाणे :
१) दिगंबर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित (वडले), २) धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (राजाळे), ३) महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (कापशी), ४) अहिल्यादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (फलटण), ५) विग्नहर ग्रामीण सहकारी पतसंस्था (साखरवाडी), ६) सह्याद्री ग्रामीण सहकारी पतसंस्था (सस्तेवाडी), ७) संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था (निंबळक), ८) संत गजानन नागरी सहकारी पतसंस्था (फलटण), ९) संपदा नागरी सहकारी पतसंस्था (फलटण), १०) गुणवरे विडणी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सेवकांची पतसंस्था मर्यादित (गुणवरे), ११) सरदार वल्लभभाई पटेल हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज सेवकांची पतसंस्था (साखरवाडी), १२) ज्योतिर्लिंग कायम सेवकांची सहकारी पतसंस्था (पवारवाडी), १३) नामदेवराव बेडके शिक्षक विद्यार्थी ग्राहक सहकारी संस्था (फलटण), १४) फलटण सहकारी ग्राहक भांडार (फलटण), १५) बागायतदारांचा विकास संघ मर्यादित (साखरवाडी).
'ड' प्रवर्गातील निवडणूक पात्र सहकारी संस्था खालीलप्रमाणे :
१) रमरत्न मजूर सहकारी संस्था मर्यादित (आंदरुड), २) पिंपरद मजूर सहकारी संस्था मर्यादित (पिंपरद), ३) हनुमान मजूर सहकारी संस्था मर्यादित (फडतरवाडी), ४) स्वयंसिद्धा महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित (फलटण), ५) श्री हनुमान काजू व फळे प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित (भवानीनगर राजुरी), ६) महाराजा टुरिझम कॉ. लि. (फलटण).
वरील 'क' आणि 'ड' प्रवर्ग संस्थातील मतदार यादी कार्यक्रम व प्रारूप मतदार यादी संबंधित संस्थांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली असून दिनांक १६ मार्च पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार असल्याचे सहायक निबंधक अधिकारी सुनील धायगुडे यांनी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
