राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची वारकरी सेवा
फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा १ व २ जुलै रोजी फलटण मुक्कामी होत. या पालखी सोहळ्यात सुमारे पाच लाखांवर भाविक सहभागी आहेत. अशावेळी वारकऱ्यांना सेवा, सुविधा, स्वच्छता अभियान आणि जनजागृतीसाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याने राष्ट्रीय सेवा योजनेची 'एनएसएस दिंडी' माऊलींच्या सोहळ्यात सहभागी आहे.
यावर्षी 'एनएसएस' दिंडीत राज्यामधून ८ विद्यापीठांतील १७० राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचा समावेश असून पालखी सोहळा फलटण तालुक्यात सर्व मुक्कामस्थळी असताना या स्वंयसेवकांनी स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता जागृती, प्रबोधन, स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, लोकशाही वारी, निसर्गवारी या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पथनाट्य सादर करत आहेत.
पुणे आळंदी पासून 'एनएसएस'चे स्वयंसेवक विद्यार्थी पालखीत सहभागी झाले असून पंढरपूरपर्यंत कचरा उचलणे, स्वच्छता करणे, वारकऱ्यांना मदत करणे, मानवी साखळी तयार करून गर्दीवर नियंत्रण ठेवणे, स्वछ भावनेने सेवा करणे, मतदान जागृती करणे, विविध सामाजिक विषयावर आधारित मार्गदर्शन करणे, यासह संबधीत ठिकाणचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणे आदी विविध उपक्रम पालखी सोहळ्या दरम्यान 'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांमार्फत राबविले जात असल्याचे प्रा. नामदेव बांगर यांनी सांगितले आहे.

'एनएसएस' दिंडीत सहभागी असलेले प्राध्यापक डॉ. राजकुमार रिकामे म्हणाले, वारीतील स्वच्छतेसोबत यावर्षी प्रामुख्याने 'लोकशाही वारी' संकल्पना मांडण्यात येत आहे. यातून मतदान जागृती करणे हा हेतू आहे. देशाची लोकशाही सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी मतदान जागृतीची गरज असून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे नितांत गरज असल्याचे डॉ. रिकामे यांनी सांगितले. पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थ्यांना डॉ. विकास कर्डीले, डॉ. संदीप देशमुख, डॉ. वैशाली वाघुले, प्रा. शालिनी घुमरे, दिनेश जाधव, स्वामीराज भिसे, ऋषिकेश चव्हाण हे मार्गदर्शन करत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
