तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी होणार सुरु
एकता दर्शन (फलटण) : फलटण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या २३८ जागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत एकूण ९०५ नामनिर्देशनपत्र दाखल झाले असून यापैकी सरपंच पदासाठी १६९ व सदस्य पदासाठी ७३६ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
२८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत होती. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत, याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. १८ डिसेंबर रोजी संबंधित मतदान केंद्रावर सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:०० यावेळेत मतदान होणार आहे. २० डिसेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहाशेजारील गोदामात मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहिर केला जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
