फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला
एकता दर्शन : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. निवडणूक नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली असून मतदान व मतमोजणी ३० एप्रिल रोजी होणार आहे.
दिनांक २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत इच्छूक उमेदवारांना आपली नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. ५ एप्रिल रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होईल. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता छाननीनंतरच्या वैद्य अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दिनांक ६ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. २१ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध व निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल व त्याचदिवशी मतमोजणीनंतर निकाल जाहिर केला जाणार आहे.

सोसायटी मतदारसंघातून ११ संचालक निवडून द्यायचे आहेत. (यामध्ये ७ सर्वसाधारण, २ महिला राखीव, १ इतर मागास प्रवर्ग, १ भटक्या विमुक्त जाती/जमाती) ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ संचालक निवडून द्यायचे आहेत. (यामध्ये २ सर्वसाधारण, १ अनुसूचित जाती/जमाती, व १ आर्थिक दुर्बल घटक), हमाल मापाडी मतदारसंघातून १ व व्यापारी आडते मतदारसंघातून २ संचालक निवडून द्यायचे आहेत. असे एकूण १८ संचालकांना निवडून द्यायचे आहेत.
इच्छूक उमेदवारांसाठी नियम व अटी :
नामनिर्देन पत्रासोबत उमेदवार व सुचक यांचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो, उमेदवार/सुचक/अनुमोदक यांचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत, वय वर्षे २१ पूर्ण असल्याचा जन्म तारखेचा पुरावा, उमेदवार हा बाजार समिती कार्यक्षेत्रात राहत असल्याचा गावकामगार तलाठी यांचा दाखला, बाजार समितीचे बेबाकी प्रमाणपत्र, बहुउद्देशीय विकास संस्था, ग्रामपंचायत मतदारसंघातील निवडायच्या जागेकरिता शेतकरी असल्याचा गावकामगार तलाठी यांचा दाखला, १ जानेवारी २०२३ नंतरचा ७/१२ उतारा, जात प्रमाणपत्र (इ.मा. प्रवर्ग, वि.जा.भ.ज प्रवर्ग, अ.जा/जमाती), आर्थिक दुर्बल घटक तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, उमेदवार बाजार समिती मंजूर उपविधीमधील नमुद पात्रता धारण करणारा असावा.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
