भोईटे कुटुंबाने केली वारकऱ्यांची सेवा : डेक्कन चौकात अन्नछत्र
फलटण : येथील भोईटे कुटुंबाच्या वतीने प्रख्यात उद्योजक अरूण शेठ व अमित भोईटे यांनी डेक्कन चौकातील अशोका हॉटेल प्रांगणात पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी अन्नछत्र उपलब्ध केले असून हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दरवर्षी चहा, नाष्टा आणि जेवन देण्याची परंपरा भोईटे कुटुंबाची असून नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्व. नंदकुमार भोईटे सामाजिक कार्यक्रम राबवित असत परंतु एक वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले, मात्र यावर्षी त्यांची उणीव भासू न देता त्यांचे बंधू अरूण शेठ यांनी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून अन्नदान करण्याची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
फलटण शहरात माऊलींच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम असून स्व. नंदकुमार भोईटे, स्व. अशोक भोईटे, व स्व. शामराव भोईटे यांच्या स्मरणार्थ सलग दोन दिवस भाविकांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची सोय भोईटे कुटुंबाच्यावतीने करण्यात आली असून याचा लाभ वारकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन अरूण भोईटे, अमित भोईटे, किरण भोईटे, अजय भोईटे, ऋतुराज भोईटे यांनी केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
