डी.एड. चौकातील रस्त्याचा चढ कमी होणार ; ९२ लाख २८ हजार रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ
फलटण : फलटण शहरातील डी.एड. चौक ते डॉ. विजयराव बोरावके बंगला (लाकडी चौक) या मार्गावरील रस्त्याचा चढ वाहतुकीला अडथळा ठरत असून तो चढ कमी करण्याची आवश्यकता असल्याचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले होते, त्या रस्त्याचा चढ कमी करण्याच्या कामाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दिपक चव्हाण यांच्या हस्ते टिकाव टाकून समारंभपूर्वक करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, डॉ. रसाळ, सुदामराव मांढरे, हेमंत बोरावके, सनी अहिवळे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर, परशुराम तावरे, तेजसिंह भोसले, राजू निकम यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) सन २०२१-२२ मधून या रस्त्याच्या कामासाठी ९२ लाख २८ हजार ५६७ रुपये खर्च करण्यात येणार असून सदर कामाची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असल्याची यावेळी आमदार दिपक चव्हाण यांनी सांगितले.
डी.एड. चौक ते डॉ. बोरावके बंगला (लाकडी चौक) या मार्गावरील रस्त्याचे काम ईगल कन्स्ट्रक्शन करणार असून ६ मीटर रुंद व दीड मीटर खाली खोदकाम करुन त्यावर खडीकरण व डांबरीकरण केले जाणार असून क्रांतिसिंह नाना पाटील चौक मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना होणारा अडथळा दूर करण्यासाठी सदर रस्त्याचा चढ कमी करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत सदर कामास आर्थिक व प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर कामाच्या संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
