ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

मतदार भाजपला निवडणुकीत धडा शिकवणार

Share This Article:
मतदार भाजपला निवडणुकीत धडा शिकवणार

फलटण : भारतीय संविधान आणि लोकशाही उध्वस्त करू पाहणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मतदार योग्य धडा शिकवणार असल्याचे सांगत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान आपण बदलू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी भाजपला दिला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण येथील गजानन चौकात आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे, विश्वजीतराजे सत्यजितराजे, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत प्रियालक्ष्मीराजे नाईक निंबाळकर, सौ.प्रतिभाताई चेतन शिंदे, सक्षणा सलगर, अनिल देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विकास नाळे, राजू निकम, शंभूराज खराटे, डॉ.विजयराव बोरावके, चेतन शिंदे, बजरंग खटके, सह्याद्रीभैया कदम, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे, विजयराव भगत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

खासदार शरद पवार पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे काही खासदार भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. मोदींना राजकीय ताकद द्यावी असे म्हणतात. लोकशाही, संविधानावर गदा आणण्याचे काम करणाऱ्यांना सर्वसामान्य मतदारांनी या निवडणुकीत धडा शिकवावा. आपण राज्य आणि देशाच्या राजकारणात गेली ५६ वर्षं काम करीत आहे. सत्ता येथे आणि जाते. सत्ताधाऱ्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवूनच काम करावे. सत्तेची हवा डोक्यात असणाऱ्यांना लोकशाहीतील जनता धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसत नसल्याचा राजकीय इतिहास आहे. देशातील सर्वच राज्यकर्त्यांनी लोकशाही आणि संविधानाचे रक्षण केले पाहिजे, सामान्यांचे हित जोपासले पाहिजे.

जनता भाजपला भुलनार नाही

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, मोहिते-पाटील गटामुळेच गेल्यावेळी भाजपचे खासदार विजयी झाले, हे सर्वश्रुत आहे. पवार साहेबांनी मला माढ्याची उमेदवारी दिली आहे. फलटणचे राजघराणे आमच्या पाठीशी असून माझी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे चिंता करण्याचे कारण नाही. भाजप माढ्यात विकासाची भाषा करते. मात्र, या विकासाचा पाया विजयदादा व रामराजे यांनी घातला आहे, हे आम जनतेला माहित आहे. दुसऱ्यांनी केलेल्या विकासाचे फुकटचे श्रेय घेण्याचा अधिकार भाजपला नाही. जनता भाजपच्या भूलथापांना भूलनार नाही.

राजघराण्यातील युवकांचे राजकारणातील अस्तित्व टिकविण्यासाठी धैर्यशील मोहिते यांच्या पाठीशी

श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले, गेली पाच वर्षे खासदार गटाने आमच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. खोट्या पोलीस केसेस केल्या. आमच्या वंशावळी दाखविल्या तरी खासदार हे आमच्या घराण्यातील नाहीत. चुकीच्या पद्धतीने प्रशासनावर दबाव आणून कार्यकर्त्यांना त्यांनी त्रास दिला, त्यामुळे आम्ही त्यांना राजकीय सहकार्य करण्याचे कारणच काय ? आमचा आदर्श एकच आहे तो म्हणजे शरद पवार. मी शेवटपर्यंत त्यांच्या सावलीत राहणार. मला राजे गटाने बाहेर काढले तरी चालेल. राजघराण्यातील अदृश्य शक्ती ही आमच्या पाठीशी आहे. राजघराण्यातील युवकांचे भविष्यातील राजकारणातील अस्तित्व टिकविण्यासाठी आम्ही आज धैर्यशील मोहिते यांच्या पाठीशी आहोत. त्यांना या निवडणुकीत निश्चित यश प्राप्त करून देणार आहोत.

यावेळी सह्याद्रीभैया कदम, बजरंग खटके, धैर्यशील लोखंडे, सक्षणा सलगर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, प्रतिभाताई चेतन शिंदे, विकास नाळे, शंभूराज खलाटे, श्रीमंत विश्वजीतराजे, श्रीमंत अनिकेतराजे, अनिल देसाई आदींची भाषणे झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने करण्यात आले. प्रास्ताविक श्रीमंत विश्वजीतराजेंनी केले. आभार प्रा.भीमराव बुरुंगले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले. सभेस शरद पवार गटातील युवक, युवती, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती सदैव तुमच्या पाठीशी 

सत्ताधाऱ्यांच्या राजकीय वर्तनावरून आज लोकशाही टिकते की नाही अशी शंका येऊ लागली आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांची पायमल्ली होता कामा नये. भारतीय संविधान बदलण्याची भाजपची पावले सर्वसामान्यांनी ओळखली आहेत. विजयसिंह मोहिते-पाटील, रामराजे, संजीवराजे यांची आपणास साथ होती. या सर्वांचे प्रयत्न या भागाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे होते. फलटण विधायक कामांचा आदर्श आहे. मात्र, येथील लोकांना यातना देण्याचे काम भाजपचे लोक करीत असतील तर त्यांना धडा देण्याची योग्य वेळ आली आहे. सामूहिक शक्तीने विकास होत असतो. आज महाराष्ट्राचं चित्र बदलतंय यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांना संसदेत पाठवा. मी स्वतः संसदेत त्यांच्या पाठीशी राहिन याची ग्वाही देतो, असे सांगत रघुनाथराजे तुम्ही एकटे नाही तर फलटणच्या पाठीशी सदैव बारामती राहील चिंता करू नका, असे आश्वासन शरद पवार यांनी याप्रसंगी राजघरण्यातील व्यक्तींना दिले.

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...