फलटणमध्ये दोन दिवस संस्कृती महोत्सव
एकता दर्शन : (फलटण) ‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ दि. १६ जानेवारी पासून सुरु होत आहे. हा उपक्रम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ फलटण शाखेच्या सहकार्याने होत आहे. दोन दिवस चालणारा हा उपक्रम फलटण येथील महाराजा मंगलकार्यालयात संपन्न होणार असून यामध्ये समाजसंस्कृतीचे प्रदर्शन, परिसंवाद, मुलाखती आदींचा समावेश असल्याची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’चे नितेश शिंदे व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि.१६ रोजी सकाळी १०:३० वाजता संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ व थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे मुख्य संपादक दिनगर गांगल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ वाजता ‘युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पत्रकार स्वप्नील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत गुरव, पत्रकार प्रगती जाधव-पाटील, अधिवक्ता अॅड.सुस्मिता धुमाळ सहभागी होणार आहेत. यावेळी अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थिती राहणार असून मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार हे या परिसंवादाचे संवादक असणार आहेत.

दुपारी ४ वाजता ‘वेध स्त्रीजीवनाचा’ या परिसंवादामध्ये श्री गोविंदकाका उपळेकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रगत शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ.मंजिरी निंबकर, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अॅड.सौ.मधुबाला भोसले सहभागी होणार असून अंजली कुलकर्णी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता ‘फलटणची उद्योगभरारी’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे, यामध्ये गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् प्रा.लि;चे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, निंबकर अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ.अनिल राजवंशी, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, के.बी.एक्सपोर्ट प्रा.लि;चे संचालक सचिन यादव सहभागी होणार असून प्रा.सतीश जंगम त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. प्रारंभी परिसंवादाचे प्रास्ताविक युवा पत्रकार प्रसन्न रुद्रभटे करणार आहेत.
दुपारी ३ वाजता ‘स्थानिक मनोरंजनाच्या ग्लोबल हाका’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये साहित्यिक वसीमबारी मणेर, मुधोजी महाविद्यालयाचे प्रा.अशोक शिंदे, आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख वैशाली शिंदे सहभागी होणार असून त्यांच्याशी साहित्यिक प्रा.नितीन नाळे संवाद साधणार आहेत.
या दोन दिवसीय महोत्सवात स्थानिक समाज संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन मांडण्यात येणार असून निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही मूल्य व नागरिकांचे हक्क सांगणारे विविध स्टॉल, व ‘कमला निंबकर बालभवन प्रकल्पाचे स्टॉल उपलब्ध असतील ज्यामध्ये फलटणच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांची निरीक्षणे दृश्यात्मक पद्धतीने मांडण्यात येणार आहेत. यासह फलटण तालुक्यातील लेखक कवींच्या प्रकाशित पुस्तकांचे दालन उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्याचे संयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे व प्रमुख कार्यवाह अमर शेंडे करणार आहेत.
आधुनिक लोकशाही मूल्यांच्या संदर्भात स्थानिक संस्कृतीचा वेध घ्यावा हा महोत्सव आयोजनामागील मुख्य हेतू आहे, यातून पारंपरिक भारतीय मूल्ये आणि आधुनिक लोकशाही मूल्ये यामधील संगती-विसंगती ग्रामीण संस्कृती संदर्भात तपासली जाणार आहेत. ‘थिंक महाराष्ट्र’च्या वतीने राज्यातील सुमारे ४५ हजार खेड्यांतील माहिती संकलन करण्याचा मानस असून सध्या पाच तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये फलटण तालुक्याचा समावेश असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
