जैन साधूंच्या हत्येचा फलटणमध्ये निषेध
एकता दर्शन, फलटण : कर्नाटक राज्यात झालेल्या जैन साधूंच्या हत्येचा निषेध व्यक्त करत या हत्येचा तपास केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावा व गुन्हेगारांना कडक शासन करावे या प्रमुख मागणीसह हत्या प्रकरणाच्या सबंधित विविध मागण्यांचे निवेदन येथील जैन समाजाच्या वतीने महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुड आश्रमातील जैन आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांची दि.५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर येथील जैन समाजाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत अधिकार गृहसमोर हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून निवेदन दिले. यावेळी महिला, पुरुष, तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भारतामध्ये असलेल्या जैन समाजाला, समाजाच्या ट्रस्ट, देवस्थान, धर्मगुरूंना पोलीस संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस भूमिका घ्यावी. जैन धर्मगुरू पायी प्रवास करत असताना त्यांना शाळा व महाविद्यालयात वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्यासंदर्भात शिक्षण खात्याने नियमात आवश्यक ते बदल करून संबंधित विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात. जैन धर्मगुरु पायी विहार करत असताना त्यांच्यावर प्राण घातक हल्ले होत असल्यामुळे विहार दरम्यान जैन साधुंना पोलीस संरक्षण मिळावे. जैन आचार्य श्री १०८ कामकुमार नंदीजी महाराज यांची हत्या करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा, त्यांना कडक शासन करावे आदी मागण्यांचे निवेदन पुरवठा निरीक्षक शिवाजी जगताप व मनोज काकडे यांच्याकडे देण्यात आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
